बजरंग दल घोडेगाव तर्फे आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेत ६० स्पर्धकांचा सहभाग

सिताराम काळे, घोडेगाव

घोडेगाव (ता. आंबेगाव) शहरात विश्व हिंदु परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी यांनी आयोजित केलेल्या भव्य किल्ले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कैवल्य शेटे घोडेगाव, महाराणा ग्रुप चिंचोली, शिवबांचे मावळे यांनी पटकावला, यांना पुणे जिल्हा विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनीच्या संयोजिका स्वप्ना खामकर, महेश पिंगळे यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षिस व गौरवपत्र देण्यात आले.

विश्व हिंदु परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी यांनी आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेमध्ये ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावर्षी मंडळातर्फे रोख बक्षिस व स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला गौरवपत्र दिले. स्पर्धेत व्दितीय क्रमांक विराज काळे, यश कोकणे. तृतीय क्रमांक छत्रपतींचे मावळे चिंचोली, आर्य घोडेकर. चतुर्थ क्रमांक सोहम हुले नारोडी, हर्षल भोर चास तसेच उत्तेजनार्थ बक्षिसही बालगोपाळांना देण्यात आली. कोरोना संसर्गाच्या शासकीय नियमांचे पालन करून हा बक्षिस वितरण समारंभ हनुमान मंदिर घोडेगाव येथे पार पडला.

यावेळी बक्षिस वितरण समारंभासाठी मोठया संख्येने बाळगोपाळ सहभागी झाले होते. ओम साई मंगल कार्यालय घोडेगाव, श्री स्वामी समर्थ कंन्स्ट्रक्शन घोडेगाव, सागर काळे, सुरज यादव, गणेश घोडेकर, अक्षय नंदकर, बबन घेवारी, राम घेवारी, सनी शेटे, विशाल डामसे, अनिकेत काळे, आशिष घोलप, अमोल शेवाळे, वैभव काळे, सुमित दिवेकर, सार्थक काळोखे, करण सोनवणे, अक्षय येवले, अभि पानसरे, मयुर मांदळे, आदिनाथ काळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात आले.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिना निमित्त आरोग्य शिबीर संपन्न
Next articleमंचर ग्रामपंचायतीचे होणार नगरपंचायतीत रूपांतर