मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिना निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुका पत्रकार संघ व विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात पत्रकार व कुटुंबातील ४८ जणांची तपासणी करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिना निमित्त हवेली तालुका पत्रकार संघ व विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ४८ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता या शिबीराला पत्रकार व डॉक्टरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती. दुपारी ३ वाजता डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर शिबीराचा समारोप करण्यात आला.

या शिबीरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, वजन, उंची, ईसीजी व त्याचबरोबर खास करुन महिलांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्तन व गर्भाशयाचा कर्करोगा संदर्भात तपासणी करण्यात आली.

या शिबीरासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आदिती कराड, व्यवस्थापक डाॅ पी के देशमुख, डॉ राकेश शहा, डॉ रुपा शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, संदीप बोडके, जयदीप जाधव, जितेंद्र आव्हाळे, रियाज शेख, विजय काळभोर, भाऊसाहेब महाडिक, राजकुमार काळभोर, विशाल शेलार सह पत्रकार उपस्थित होते.

यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र बापू काळभोर यांच्या हस्ते डॉ रुपा शर्मा व डॉ मोहन वाघ यांच्या हस्ते डॉ राकेश शहा यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सातव यांनी केले तर, आभार तुळशीराम घुसाळकर यांनी मानले.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेची दैदिप्यमान परंपरा… विभागीय सचिव बापुसाहेब गोरे
Next articleबजरंग दल घोडेगाव तर्फे आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेत ६० स्पर्धकांचा सहभाग