ऊसतोड कामगाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; एकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकी फाटा येथे नाशिक येथील नांदगाव तालुक्यातुन मोलमजुरी ,व ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर त्यांच्याबरोबर ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत त्या मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने संबंधित व्यक्ती विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व त्यांचे कुटुंब नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून ते शेतात मोलमजुरी ची कामे करतात तसेच ऊस तोडणीच्या काळात ते पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ऊस तोडण्यासाठी व शेती कामासाठी येत असतात मागील वर्षी २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात हे कुटुंब आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे एका शेती मालकाकडे कामानिमित्त आले असता त्यांच्या शेतात झोपडी करून राहत होते. ऑक्टोबर महिन्यातील एका दिवशी फिर्यादी व तिचा नवरा फिर्यादीची अल्पवयीन मुलगी शेतात काम करत असताना दुपारच्यावेळी फिर्यादी व तिचा नवरा घरी जेवण्यासाठी गेले असता अल्पवयीन मुलीला शेतात एकटी काम करत आहे असे पाहून त्यांच्या बरोबरच ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा सागर राठोड रा. आंबेउपळे ता.कन्नड याने अल्पवयीन मुलीस जबरदस्ती करत उसाचे शेतात नेऊन बलात्कार केला व तू या बद्दल कुणाला सांगितले तर तुला व तुज्या कुटुंबीयांना जीवे मारू अशी धमकी दिली त्यानंतरही त्याने तिच्यावर तीन वेळा जबरदस्तीने वारंवार अत्याचार केला.

त्यानंतर खडकी येथील शेतकऱ्यांचे काम संपल्यानंतर हे कुटुंब आपल्या मूळ गावी गेले असता दिनांक १६ जून २०२० रोजी या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून ती गर्भवती असून तिची प्रसूतीची वेळ जवळ आली असल्याचे सांगितले त्या नंतर त्या मुलीस दि.१७ रोजी मुलगा झाला. याबाबत नांदगाव पोलिसांना समजले असता त्यांनी व मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता पीडित अल्पवयीन मुलीने घडलेली घटना सांगितली. सदर घटना मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेबाबत सागर राठोड रा.आंबेउपळे,ता.कन्नड या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.

Previous articleघोडेगाव येथे तबला मेकर्स दुकान चोरट्यांनी फोडले ; रोख रक्कम व साहित्य मिळून ७० हजाराची चोरी
Next articleसंतापजनक-साडेपाच वर्षे वयाच्या मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी ४५ वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल