चाकणमध्ये ड्राय डे च्या दिवशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची कारवाई

चाकण- सुचिता भोसले

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने चाकणमध्ये ड्राय डे असताना अवैधरित्या दारूची विक्री चालू असलेल्या हॉटेल मालकावर कारवाई केली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने चाकण पो.स्टे हद्दित ड्राय डे दिवशी अवैधरित्या दारूची विक्री चालू असलेल्या हॉटेलवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त, कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड यांचे आदेशान्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंदयास प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चाकण – शिक्रापूर रोडवर इण्डेन बॉटलींग प्लांट समोर, साई मुद्रा व्हेज नॉनव्हेज नावाचे हॉटेल असून हॉटेलचा मालक निलेश बाळासाहेब पानसरे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, चाकण पुणे हा हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारू तसेच बियरची विक्री करत असताना पोलीसांनी रंगेहाथ पकडले.

सुरक्षा पथकाने चाकण शिक्रापूर रोडवर जाऊन इण्डेन बॉटलींग प्लांट येथे थांबून एक बनावट गिर्‍हाईक पाठवून बातमीप्रमाणे खात्री केली असता पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी (दि .०१ )रोजी शिक्षक व पदवीधर मतदार संघ पुणे विभाग निवडणूक 2020 असल्याने निवडणूक पारदर्शक तसेच शांततेच्या निर्भय व निःपक्षपाती वातावरणात व्हावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून 48 तास अगोदर ड्राय डे घोषीत केला होता व देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याचे खात्री होताचा साई मुद्रा हॉटेलवर छापा टाकला असता घटनास्थळावर 40 हजार 931 रूपये किंमतीचाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करित आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोउनि धैर्यशिल सोळंके, सपोफी विजय कांबळे, पोलीस हवालदार सुनिल शिरसाट, पो.न. भगवंता मुठे, पो.ना. अनिल महाजन, पोना अमोल शिंदे, पोना नितीन लोंढे , पोशि मारुती करचुंडे, पोशि राजेश कोकाटे, पो.शि. योगेश तिडके यांनी केली आहे.

Previous articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा वाढदिवस अविश्री बालसदन मध्ये साजरा
Next articleवेश्या व्यवसाय चालवणाऱ्या विश्वनाथ लॉजवर नारायणगाव पोलिसांची कारवाई ;तीन जणांना अटक