घोडेगाव येथे तबला मेकर्स दुकान चोरट्यांनी फोडले ; रोख रक्कम व साहित्य मिळून ७० हजाराची चोरी

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळा नंबर 27 मध्ये असलेल्या रवी तबला मेकर्स या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून दुकानातून सुमारे ७० हजारांची चोरी करण्यात आली आहे.

याबाबत दुकानदार रवींद्र मारुती शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 25 रोजी ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले असता रात्री त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दुकानात दुरुस्तीसाठी आलेले ४ तांब्याचे नगारे ,४ स्टील चे ताशे ,१पितळी ताशा,व २ हजार रोख रक्कम असा एकूण ७० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत रवींद्र शेटे हे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला याबाबत त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.