क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी इंदापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुचिता भोसले-इंदापूर तालुका माळी सेवा संघ व इंदापूर शहर माळी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या गावातील ग्रामस्थ यांनी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये एकुण 63 लोकांनी रक्तदान केले, विशेष म्हणजे पुनमताई बोराटे या युवतींनी पण रक्तदान करून समाजामध्ये वेगळा संदेश दिला. सदर रक्तदान शिबीरासाठी मा सुहास बोराटे यांनी विशेष पर्यत केले.

तत्पूर्वी सकाळी श्री. संत सावतामाळी मंदिर विठ्ठलवाडी इंदापूर येथे द्वीप प्रज्योलन करून ,महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, श्री. संत सावतामाळी महाराज यांचे दर्शन घेऊन आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा जोतिबा फुले यांनी केलेले कार्य त्यांनी कोणत्या परिस्थितीतुन दिवस काढले, त्यांना आपल्या समाज्या बरोबरच इतर सर्व मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी किती समस्या निर्माण झाल्या होत्या, अशा कित्येक गोष्टींना तोंड द्यावे लागले होते, असे अजून खुप काही मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी इंदापूर शहर येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी साहेब व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, नंतर इंदापूर तालुका माळी सेवा संघ व इंदापूर शहर माळी सेवा यांची बैठक हाॅटेल स्वामीराज इंदापूर येथे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक उत्साहात पार पडली .यावेळी इंदापूर तालुका व शहर नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड व नियुक्ती पत्र वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दत्ताभाऊ माळी साहेब, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी कार्याध्यक्षा सौ. रूपालीताई रायकर, युवा प्रदेश अध्यक्ष मा. श्री. गणेशजी राऊत साहेब, बिझनेस आघाडी राज्य अध्यक्ष मा श्री. संतोषजी राऊत साहेब, महाराष्ट्र राज्य लिगल सेल अध्यक्ष व कायदेशीर सल्लागार मा श्री. अॅड नितीनजी राजगुरु साहेब,पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा श्री अशोकजी शिंदे साहेब, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा श्री. ज्ञानेश्वरजी जाधव साहेब, हडपसर विधानसभा अध्यक्ष मा श्री संतोषजी कोरपडे साहेब, खडकवासला विधानसभा अध्यक्ष मा श्री. संतोषजी माळी साहेब, इंदापूर तालुका माळी सेवा संघाचे अध्यक्ष मा .श्री. बापुसाहेब बोराटे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष महेशजी शिंदे साहेब, इंदापूर शहर अध्यक्ष चि. सुहास बोराटे, तालुका कार्याध्यक्ष विजय शिंदे, तालुका सचिव गणेश व्यवहारे, इंदापूर तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी, तालुका संपर्क प्रमुख वैभव बनकर,तालुका सचिव संदिप बारवकर, इंदापूर शहर उपाध्यक्ष स्वप्निल गदादे, इंदापूर शहर संघटक शांताराम बोराटे, कव्हे गावचे शाखा अध्यक्ष सचिन लक्ष्मण काळे विठ्ठलवाडी ग्रामपंचायत चे सरपंच मा श्री सुनिल वामन बोराटे , ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डाके, दत्तात्रय नाळे, मेजर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोंग, गोविंद बोराटे, पोपट बोराटे,विशाल सावंत, पुनमताई बोराटे, सारीकाताई बोराटे, व इंदापूर तालुका माळी सेवा संघ व इंदापूर शहर माळी सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांनी केले तर आभार शहर प्रमुख सुहास बोराटे यांनी मानले.

Previous articleपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून चांडोलीत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित
Next articleछत्रपती युवा सेना संघटनेत सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश