Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पवनानगर-येळसे येथील ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेली महिना भर सुरु असलेल्या काकडा आरती समाप्ती वेळी काल्याचे किर्तन (दि.३०)रोजी सकाळी १० ते १२ वाजता हभप अशोक महाराज पवार यांच्या किर्तन सेवेने सांगता करण्यात आली आहे.
यावेळी येळसे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.यावेळी किर्तनकार हभप.अशोक महाराज पवार यांचा सत्कार श्री संत तुकाराम साखर माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर व येळसे तटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर यांच्या हस्ते करण्यात आला. मृदुगमणी,गायक,याचा येळसे ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला आहे.
किर्तन सेवेकरीता घेतलेला अंभग
याल तरी यारे लागे | अवघे माझ्या मागे मागे ॥1॥ आजी देतो पोटभरी l पुरे म्हणाल तोवरी….. या काल्याच्या प्रकरणातील अभंगातुन हभप अशोक महाराज पवार यांनी देव आणी भक्तांच नात कस असत याच वर्णन केल , तसेच व्यसन अन् फॅशन यात अडकुन न पडता आजच्या तरुणाईने निर्व्यसनी , सदाचारी , बनाव असा संदेश अशोक महाराज पवार यांनी दिला. तसेच तरुण पिढी सशक्त बनण्यासाठी नित्य व्यायाम , योग , प्राणायाम करावा , तरुणांना संस्कार त्याच बरोबर स्वसंरक्षण ही करता आल पाहीजे , साधु संताने सांगीतलेल्या मार्गाने चालल्यास आपणास कसलेही भय उत्पन्न होणार नाही असे प्रतीपादन केले.
यावेळी श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, मा.सरपंच विजय ठाकर,माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर, तटांमुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर,हभप.गणपत महाराज सुतार, जेष्ठ नागरिक अध्यक्ष पांडूरंग कडू,हभप.धोंडू महाराज भोते,दशरथ ठाकर,बबन सुतार,नितीन वाघमारे, माजी चेअरमन काशिनाथ कडू,गोविंद ठाकर,श्रीपती ठाकर, मारुती महाराज ठाकर,पत्रकार सचिन ठाकर,राजेश राऊत,शंकर ठाकर,प्रमोद ठाकर,संजय ठाकर, विशाल घोडके,दत्तात्रय ठाकर,अमित ठाकर, मिथुन भोते,नवनाथ आडकर,आंनदा सुतार,हभप.पंकज महाराज सुतार,शाहजी ठाकर,आबु बोडके,यांच्या सह मोठ्या प्रमाणावर गावातील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.