देशी व विदेशी दारूची खुलेआम विक्री,दारू पिणारे जोमात प्रशासन कोमात

चाकण-विधानपरिषद पदवीधर व शिक्षक निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे . मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने व स्थानिक पोलिसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे चाकण मधील तळेगाव चौकात बेकायदेशीरपणे देशी व विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे .

चाकण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निश्क्रियते मुळे चाकण मध्ये वैध – अवैध देशी विदेशी दारु विक्रेत्यांकडून आचारसंहितेचे नियम पायदळी तुडवले जात आहे.

पोलिसांच्या व जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निश्क्रिय धोरण व अकार्यक्षमवृत्ती मुळे चाकण परिसरात परवाना धारक देशी – विदेशी दारु विक्रेते बेलगाम झाल्याचे दिसत असून संबंधित परवाना धारक किरकोळ देशी – विदेशी दारु विक्रेते आता जिल्ह्यात सर्वत्र होलसेल दारुची विक्री करुन अवैध देशी – विदेशी दारुल विक्रीला प्रोत्साहन देत असल्यामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बेकायदेशीर देशी – विदेशी दारु अड्डे राजरोसपणे चालतांना दिसत आहे.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक सुरळीत , शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून कलाम १४४ लागू राहणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले . विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे . तर ३ डिसेंबर २०२० रोजी मतमोजणी होणार आहे . ही निवडणूक प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावारणात पार पाडणाच्या दृष्टीकोनातून शासकीय , निमशासकीय , सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात वापर करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत . निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षांची चित्रे , चिन्हांचे कापड फलक , सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात येत आहेत . निवडणूक कालवधीत जिल्हाधिकारी कार्यालय , सर्व उपविभागीय आधिकारी कार्यालय , सर्व तहसिल कार्यालये , सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढणे , मोर्चा काढणे , सभा घेणे उपोषण करणे , कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे इत्यादी , कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Previous articleजेष्ठ शिक्षक रतीलाल बाबेल राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम
Next articleयेळसे येथे काकडा आरती समाप्ती