सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत चिमुकल्यांनी आकर्षक प्रतिकृती साकारत दारोदारी छत्रपतींचा इतिहास जागविला

अमोल भोसले, पुणे

पुणे-कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत गावातील चिमुकल्यांनी आकर्षक प्रतिकृती साकारत दारोदारी छत्रपतींचा इतिहास जागविला. सुमारे पस्तीस चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी लहान मुलांच्या कलाविष्काराला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामधील विजेत्यांसह सहभागी मुलांनाही रोख बक्षीसे देण्यात येते.

यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत रुद्र अंकुश मांजरे, विराज गणेश कोबल, श्रीकांत विठ्ठल आंबेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय वृषाली शंकर कोबल, तेजल संजय गायकवड, विपुल संतोष सांडभोर, श्रेयस दत्तात्रय कोबल, रितेश विलास कोबल, पार्थ मिलिंद कोबल, किरण बाळासाहेब मांजरे, आयुष संतोष पवार, राज विकास कोबल, वेदांत शामराव आंबेकर, मनिष दिपक नाईकडे, सक्षम प्रविण आंबेकर, सोहम उल्हास रणपिसे, आर्यन निलेश कोबल, वैष्णवी जयराम मंडलिक या सहभागींना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतोष सावंत, विनोद कोबल, जयसिंग मंडलिक, रविंद्र थोरात, प्रवीण मांजरे, प्रमोद सहाणे, विलास कोबल, योगेश खाडे, कुंडलिक कोबल, संतोष पवार यांनी स्पर्धेचे संयोजन व किल्ल्यांचे परिक्षण केले.

Previous articleएमटीडीसीचे कोयनानगर निवासस्थान होणार पर्यटकांसाठी खुले
Next articleजेष्ठ शिक्षक रतीलाल बाबेल राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम