एमटीडीसीचे कोयनानगर निवासस्थान होणार पर्यटकांसाठी खुले

पुणे- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सर्व कर्मचाऱ्यांनी “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून टाळेबंदीच्या कठीण काळातही काम करुन परिसर आणि खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. आसपासचा परिसर स्वच्छ ठेवत आहोत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील 2 वर्षासाठी करणार असुन पर्यटकांना एम. टी. डी. सी. ची निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर अशी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर देण्यात आलेले आहेत. तसेच सोशल डिस्टंन्सिंग आणि कोरोना बाबतची खबरदारी याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एमटीडीसीचे पुणे विभागातील कोयना अभयारण्य आणि धरण क्षेत्राच्या परिसरात असलेले पर्यटक निवास कोयना लेक, कोयनानगर डिसेंबर महीन्याच्या पहील्या आठवडयात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. निसर्गरम्य परिसर असलेले पर्यटक निवास कोयना लेक मधुन कोयना धरणाचे नयनरम्य दृश्य आणि निसर्गसौंदर्य डोळयांना सुखावत आहे. पर्यटक निवास कोयना लेक येथे 2 लोकनिवासासह 22 खोल्या (कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स आणि डिलक्स रुम्स) असुन महीला व पुरुषांसाठी स्वतंत्र लोकनिवासाची सोय आहे. अत्यंत रमणीय अशा या परिसरात उत्कृष्ट आणि रुचकर भेजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्ता वाहनतळ आणि मन मोहुन टाकणारे हिरवेगार लॉन ही पर्यटक निवास कोयना लेक ची वैशिष्टये आहेत.

पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवासे ही समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी यादगार करण्यासाठी एम. टी. डी. सी. च्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहेत. महामंडळानेही अशा हौशी पर्यटकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पर्यटक निवासातील व्यवस्थापकांनाच सदर बाबत अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे.

दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी तसेच मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे उत्साही स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे.

पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनायांची माहीत वेबसाईट आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.

पर्यटक निवासात आलेल्या पर्यटकांचे स्वागत करुन त्यांना सॅनिटायझर वापरण्यास विनंती करण्यात येते, तदनंतर पर्यटकांचे शरीराचे तापमान आणि ऑक्सीजन यांची नोंद घेण्यात येते, पर्यटकांची मागिल प्रवासाची माहीती घेवुन त्यांची नोंद घेतली जाते. पर्यटकांच्या समोर त्यांना देण्यात येणाऱ्या सुटचे सॅनिटायझेशन केले जाते आणि तदनंतरच पर्यटकांना रुम देण्यात येते. कोरोना आजाराविरुध्द सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि, पर्यटकांनी निसर्गाचे भान ठेवुन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आले आहे.-दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous articleभक्तीमय वातावरणात काकड्याची सांगता सोशल डिस्टंसिंग मध्ये संपन्न
Next articleसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत चिमुकल्यांनी आकर्षक प्रतिकृती साकारत दारोदारी छत्रपतींचा इतिहास जागविला