भक्तीमय वातावरणात काकड्याची सांगता सोशल डिस्टंसिंग मध्ये संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन 

“भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति, पंचप्राण जीवे – भावे ओवाळू आरती’ अशी आराधना करीत सोशल डिस्टंसिंग व ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळून गेली महिनाभरापासून परिसरात सुरू असलेल्या काकड्याची भक्तीमय वातावरणात सांगता झाली. सांगतेचा पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा करता आला नसल्याची रखरुख मात्र भाविकांच्या चेहऱ्यावर यावेळी स्पष्टपणे दिसून आली.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची प्रथा आहे. मांजरी बुद्रुक, साडेसतरानळी, फुरसुंगी, शेवाळेवाडी येथील मंदिरांमध्ये दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो. येथे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात काकड्याचे अभंग, आरती व विविध स्तोत्रे म्हटली गेली. टाळ मृदंगाच्या गजरात कृष्णाच्या लीलांचे व सावळ्या विठ्ठलाचे वर्णन करणारी गीतेही यामध्ये गायली गेली.

मांजराई प्रासादिक दिंडी मंडळ मांजरी बुद्रुक विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात काकडा साजरा करण्यात आला. अध्यक्ष भाऊसाहेब मुरकुटे, उपाध्यक्ष राजेंद्र घुले, विणेकरी पांडुरंग घुले, पेटीवादक कुमार बेल्हेकर, जगन्नाथ घुले, मृदुंग वादक रमेश घुले, भीमसेन सुरवसे तसेच आप्पा थोरात, पांडुरंग घुले, रामभाऊ कुंजीर, आबासाहेब शिंदे, तुकाराम घुले, बापू टकले, डी. एम. घुले, माऊली घुले, संभाजी घुले यांनी काकडा उत्सव साजरा केला.

Previous articleकौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुण्यात बैठक
Next articleएमटीडीसीचे कोयनानगर निवासस्थान होणार पर्यटकांसाठी खुले