महासूर्योदय मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील महासूर्योदय मित्र मंडळाच्या वतीने माजी सरपंच स्वर्गीय दिलीप कोठारी व माजी ग्रामपंचायत सदस्य स्वर्गीय रमेश आण्णा पांचाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नारायणगाव येथील महावीर भवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे ४०३ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिलांनी देखील या शिबिरात उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. आपले प्रतिनिधी किरण वाजगे यांनी ३६ व्या वेळी रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या शिबिरा प्रसंगी आमदार अतुल बेनके, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, युवा उद्योजक अमित बेनके, सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, उद्योजक अशोक गांधी, अनिल दिवटे, सूरज वाजगे, रोहिदास केदारी, सागर दहितुले, जयेश कोकणे, निलेश गोरडे, सचिन तांबे, संदीप शिंदे, संकेत वामन, आरिफ आतार, हेमंत कोल्हे अजित वाजगे, ईश्वर पाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन महासुर्योदय मित्रमंडळाचे अध्यक्ष सुदीप कसाबे, अक्षय कसाबे, किरण वारुळे, संकेत शेजवळ. अनिकेत कराळे, दशरथ कांबळे, राहुल दळवी, ऋषिकेश कुंभार, अनिकेत मते, अभय कोठारी, विजय पांचाळ, आनंद पांचाळ, अभिषेक बनकर, स्वरूप पांचाळ, सिद्धू कर्पे आदी कार्यकर्त्यांनी केले.

Previous articleत्रिपुरी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव
Next articleमहाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – आढळराव पाटील