त्रिपुरी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव

सिताराम काळे घोडेगाव

त्रिपुरी पोर्णिमे निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव साजरा करण्यात आला. शंकर व पार्वती यांनी अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला व या विश्वाचे रक्षण केले. या दिवसाची आठवण म्हणून भीमाशंकर मध्ये दरवर्षी त्रिपुरी पोर्णिमा साजरी केली जाते. याही वर्षी शिवलींगावर पोशाख चढवून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व विदयुत रोषनाई करण्यात आली.त्रिपुरी पोर्णिमेला भीमाशंकरचे आगळेवेगळे महत्व आहे.

वैकुंठचर्तुदशीच्या म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमेच्या अधल्यारात्री बारा वाजता शिवलींगावर वर्शातून एकदाच हरिहरेश्वर भेट घडवून आणली जाते व तुळशीची पाने वाहिली जातात. तुळशीची पाने वाहण्यासाठी मोठया संख्येने भाविकभक्त व साधुसंत येथे येत असतात परंतु कोरोनाच्या प्रादुर्भामुळे यावेळी संख्या कमी होती. ब्रम्हदेवाने तारकासुरला पुरूष, स्त्री, पशु, पक्षी अशा कोणाकडूनच तुझा वध होणार नाही असा वर दिला होता. त्यामुळे तारकासुराने संपुर्ण विश्वात हाहाकार माजवला होता. या तारकासुराचा वध करण्यासाठी शंकर व पार्वती यांनी अर्धनटीनारेश्वराचे रूप धारण करून तारकासुराचा वध केला म्हणून या कार्तिकी पोर्णिमेला त्रिपुरी पोर्णिमाही म्हटले जाते.

या दिवसाची आठवण म्हणून भाविक भीमाशंकर मध्ये येतात व त्रिपुरवात पेटवतात. हि त्रिपुरवात विझे पर्यंत शंकराची अराधना करतात व वात विझल्यानंतर त्याचे भस्म घरी घेऊन जातात. हि प्रथा अनेक वर्षांपासुन येथे सुरू आहे. परंतु यावर्षी शासन नियमाप्रमाणे कोणालाही थांबु देण्यात आले नाही. मंदिर परिसरात दिवे लावण्यात आले. हि सजावट झाल्यानंतर मंदिरात महाआरती घेण्यात आली.

Previous articleदौंड मध्ये महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
Next articleमहासूर्योदय मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन