दौंडमध्ये “संविधान गौरव दिन” उत्साहात साजरा

Ad 1

दिनेश पवार,दौंड

संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान स्तंभाची समिती व नगरपरिषद दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तालुका तथा शहरामध्ये चित्ररथ द्वारे, भित्तीपत्रके, हस्तपत्रके द्वारे संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य संविधानातील आदर्श तत्वे संपूर्ण तालुक्यामध्ये दि. 24 व 25 या दिवशी घराघरात ,गावागावात ,संविधानाचे विचार पोहोचवण्याचे काम समितीने केले.त्याचा सांगता समारंभ दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6. वा. राष्ट्रसंत गाडगे महाराज चौक येथे माजी आमदार तथा पी. डी.सी.सी. बँक पुणे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात यांच्या शुभ हस्ते दौंड तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते,धर्मगुरू, विशेष व्यक्ती यांना भारतीय संविधानाच्या प्रति देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रमेश आप्पा थोरात यांनी समितीने हा जो उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संविधानाचे महान कार्य गावागावात, घराघरात पोचवण्याचे काम श्री दिपक भाऊ सोनवणे यांनी केल्यामुळे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.तसेच भविष्यात कसलीही अडचण आल्यास आम्ही त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवली या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती व सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे पाटील, पुणे जिल्हा गटनेते बादशहा भाई शेख, अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष जितेंद्र भैय्या बडेकर, दौंड उपनगराध्यक्ष वशिम भाई शेख,पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल भैया खान, पुणे समाज कल्याण सभापती सारिका ताई पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष (महिला) वैशालीताई नागवडे, पुणे जिल्हा युवती (महिला) अध्यक्षा पूजा बुट्टे पाटील, दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, नगरसेविका प्रणोती चलवादी,माजी नगरसेवक उत्तम सोनवणे, नितीन डाळिंबे, नरेश डाळिंबे,आबासाहेब वाघमारे, विकास कदम,हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन दिपक भाऊ सोनवणे यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ कांबळे, निलेश लोंढे, प्रकाश परदासनी विनोद लवटे ,जयदीप बनकर, मिलिंद सोनवणे,प्रकाश शिंदे, अशोक कांबळे,कैलास कांबळे ,बापूराव लोंढे जाकीर भाई शेख ,सागर सोनवणे, मेहराज शेख,मयुर कडू , सागर साबळे व सर्व सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.