शासकीय जागेतील झाडे तोडल्याने घोडेगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

Ad 1

सिताराम काळे घोडेगाव

– घोडेगाव (ता.आंबेगाव) काळेवाडी-दरेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेतील झाडे तोडल्याप्रकरणी दादाभाऊ पडवळ याच्या विरूध्द झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमाप्रमाणे घोडेगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिली.

घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस वसाहत हद्दीतील दक्षिण बाजुला संरक्षण तार कंपाउंडच्या आतील बाजुस लागुन असलेली दोन निरगिली, एक कडुलींब व एक सुभाबळ अशी झाडे विनापरवाना दि. २६ व २७ रोजी काळेवाडी-दरेकरवाडी ग्रामपंचायतीच्या गट नं. ७३/२ मध्ये असलेल्या शासकीय जागेत दादाभाऊ निंबा पडवळ (रा. साल, माळवाडी) याने झाडे तोडून नुकसान केले असल्याप्रकरणी त्याचेवर झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतीची तक्रार पोलीस हवालदार दिपक काशिद यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदिप लांडे, शंकर तळपे करत आहे.