कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने बालगंधर्वमध्ये अभंगवाणीचा भक्ती सोहळा संपन्न

अमोल भोसले,पुणे

विठु माऊली तू, माऊली जगाची… माझे माहेर पंढरी… नको देवराया अंत आता पाहु… यासह अनेक अभंग व भजनाच्या ओव्या आणि टाळ-मृदंगाच्या निनादात आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ‘विठु माऊली माझी’ हा अभंगवाणीचा भक्ती सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतरचा सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील हा पहिलाच कार्यक्रम आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने झाला.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विठु माऊली माझी’ या भक्ती सोहळ्याचे हे सलग २१ वे वर्ष आहे. कोरोना व लॉकडाऊननंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी हा पहिलाच कार्यक्रम होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंग व इतर सर्व गोष्टींचा खबरदारी घेऊनच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्रतिष्ठानचे नमोल खाबिया यांनी याााााा

व दिली.

विठु माझी माऊली या अभंगावाणीच्या भक्ती सोहळ्याची निर्मिती नमोल खाबिया व राहुल देशपांडे यांनी केली. रश्मी मोघे, संजीव मेहेंदळे व सचिन इंगळे या गायकांनी अभंग व भजनांचे गायन केले. डॉ. राजेंद्र दूरकर, पद्माकर गुजर, सोमनाथ साळुंके, अमृता ठाकूरदेसाई, निलेश देशपांडे यांनी वादनाची साथ दिली. निरुपण रविंद्र खरे यांनी केले. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच होत असलेल्या कार्यक्रमात अभंग व भजनाच्या भक्ती रसात बालगंधर्व चिंब झाले.

Previous articleसमाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने कांचन परिवाराच्या वतीने मिठाई वाटप
Next articleपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा ग्राहकांच्या हिताची- मोहिते पाटील