मंचरमध्ये अँक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवले

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अँक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे (26 नोव्हेंबर) दीडच्या सुमारास घडली आहे त्यात पाच लाख १ हजार रक्कम होती चोरट्यांनी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा वर काळया रंगाने स्प्रे करून चोरी केली आहे. याबाबत प्रकाश हिरामण पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर येथील मुळेवाडी रोडवर असणाऱ्या एक्सेस बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरून नेले आहे, हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो, चोरून नेलेल्या एटीएम मध्ये पाच लाख १ हजार रोख रक्कम होती व एटीएम मशीनची एक लाख रुपये किंमत अशा सहा लाख एक हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे, या मध्ये एक लाख रुपये किमतीचे एटीएम मशीन, १०० रुपये किमतीच्या किमतीच्या २०४१ नोटा,२०० रुपये किमतीच्या ७ नोटा,५०० रुपये किमतीच्या ५९१ नोटा ऐवज त्यांनी एटीएम चे बाहेरील दरवाज्याची तोडफोड करून त्यांच्या जवळ असणाऱ्या स्कार्पिओ गाडीत टाकून चोरून नेले आहे. रात्री ही माहिती मिळताच मंचर पोलिसांनी रात्री अनेक रस्त्यांवर नाकाबंदी केली होती, खेड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते यांनी सदर ठिकाणी भेट दिली असून, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिस तीन पथके तयार केली असून, पुणे नगर आळेफाटा या दिशेने ही पथके तपासासाठी रवाना झाली आहेत ,पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करत आहे.

Previous articleबिबट्याने पाडला वासराचा फडशा
Next articleकंपनीकडे खंडणी मागणाऱ्या माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षासह ५ जणांच्या महाळुगे पोलीसांनी मुसक्या आवळल्या