बिबट्याने पाडला वासराचा फडशा

आंबेगाव – तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील शेतकरी विश्वास नामदेव टेके यांच्या गोठ्यातील   वासरावर  बिबट्याने काल रात्री हल्ला करून फडशा पाडला. सध्या उसतोडणी चालू झाल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा कमी झाल्यामुळे ते मानवी वस्ती कडे वळु लागले आहेत.

 वडगाव काशिंबेग येथे बिबट्याने वासरावर हल्ला करत फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.येथील शेतकरी विश्वास नामदेव टेके यांचे गावालगत घर असून, घरापासून थोड्या अंतरावर जनावरे बांधलेली होती. नुकतेच जन्म झालेले दहा दिवसाचे वासरू गायीजवळ बांधलेले होते. सकाळी दुध काढण्यासाठी गोठ्याकडे गेले असता वासरू मेलेल्या अवस्थेत दिसले. शेडला  सर्व बाजूंनी नेट असुन देखील बिबट्याने नेट फाडून आत प्रवेश केला व वासराचा  फडशा पाडला. सध्या उसतोडणी चालू झाल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा कमी झाल्यामुळे ते मानवी वस्ती कडे वळु लागले आहेत. घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आलेली असुन या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरीत पिंजरा लावण्याची मागणी विश्वास टेके यांनी केली.

Previous articleबहिरवाडीत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
Next articleमंचरमध्ये अँक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवले