टपाल कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप;भविष्यात देशव्यापी मोठे आंदोलन करण्याचा इशारा

Ad 1

चाकण -परिसरातील टपाल कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप पुकारण्यात करण्यात आला आहे टपाल खात्याचे आणि पर्यायाने कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन गुरुवार (दि.२६ ) रोजी संप करणार आहे, त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांनीही या संपाला पाठिंबा देत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी व टपाल कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यातील पाचशे पन्नास टपाल कार्यालय बंद ठेवून एक दिवसीय संप करणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे सचिव संदीप महाळुंगकर यांनी दिली.

महाळुंगकर म्हणाले नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच पेन्शन योजना लागू करावी. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवण्याचे आदेश मागे घ्यावे ३०/६/२०२१ पर्यंतच्या थकबाकीचे भूकतान करा, ग्रामीण डाक सेवकांसाठी गट विमा सुविधेसह कमलेशचंद्र आयोगाच्या सकारात्मक शिफारशीची अंमलबजावणी त्वरित करावी व इतर सरकारी सेवा सुविधा ग्रामीण डाक सेवक यांना मिळण्यात याव्या, तसेच जो सरकारने टपाल सेवा खाजगी करण्याचा घाट घातला आहे त्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचेही यावेळी महाळुंगकर यांनी सांगितले .