दस्तगिर इनामदार यांची अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड

दिनेश पवार,दौंड

राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत च्या महराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अध्यक्षपदी दस्तगिर गफूर भाई इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महासचिव रमेशजी गणगे,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने,महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दीपक खैरे,प्रदेश अध्यक्ष प्रविणकुमार चित्ते,महिला अध्यक्षा मनिशाताई करडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

यावेळी पुणे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष कदम,दौंड कार्याध्यक्ष समीर काळे यांनी या निवडीबद्दल इनामदार यांचे अभिनंदन केले, या निवडीबद्दल बोलताना इनामदार म्हणाले की अल्पसंख्याक समाजाला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजना,त्याची माहिती, लाभार्थ्यांपर्यँत पोहचवण्यासाठी तसेच तरुणांना शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध करून तरुणांना स्वयंप्रेरित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे

Previous articleआहुपे खोर्‍यात भात काढणीची कामे अंतिम टप्प्यात
Next articleकनेरसर येथील मतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरणाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश