शाळेची घंटा वाजली आठ महिन्यांनी “कभी खुशी ‘ कभी गम”

बाबाजी पवळे,राजगुरुनगर-राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावी या वर्गांना सुरू करण्यास मान्यता दिल्याने खेड तालुक्यातील वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा विद्यालयात या कोरोनाच्या सावटात आणि भीतिदायक परिस्थितीत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण मागील आठ महिन्यांपासून घरी बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आपली शाळा उघडली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . तसेच त्यांच्यामध्ये विलक्षण कुतूहल देखील दिसून आले .

दरम्यान , आज प्रत्येक शाळेत शासन नियमाप्रमाणे विद्यार्थी उपस्थित राहिल्याचे दिसून आले . शाळा जरी दुपारी उघडणार असल्या तरी सकाळी नऊ वाजल्यापासूनच प्रत्येक शाळेत लगबग दिसून आली . आज उपस्थित प्रत्येक विद्यार्थी मास्क , सॅनिटायझरसह हजेरी लावलेला दिसला . त्यानंतर शाळेत उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात आली . शिक्षक त्याची नोंद दप्तरी करताना दिसले . आज शाळेत शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहून आजच्या स्थितीची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले.

 

शासन आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करून वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात शासकीय परिपत्रकानुसार इयत्ता नववी ते दहावी चे वर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक मगदूम यांनी दिली. सर्व शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या असून सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि ४० विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleभुजबळ परिवारांचा सामाजिक वारसा उल्लेखनीय – आमदार अतुल बेनके
Next articleचांडोली परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद