भुजबळ परिवारांचा सामाजिक वारसा उल्लेखनीय – आमदार अतुल बेनके

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय जयसिंग भुजबळ यांचा सामाजिक कार्याचा वारसा उल्लेखनीय असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव सामाजिक कामात अग्रेसर आहेत, असे प्रतिपादन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी वारुळवाडी येथे केले.

नंबरवाडी, आनंदवाडी, वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरात होतकरू आणि सर्वसामान्य कुटुंबांना दिवाळी भेटवस्तू वाटप कार्यक्रम आमदार बेनके यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

यावेळी आमदार बेनके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास पाटे, बाजार समितीचे माजी संचालक शिरीष बो-हाडे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वारुळे, आशिष फुलसुंदर, जालिंदर कोल्हे, सत्यवान अडसरे, देविदास भुजबळ, एम डी भुजबळ, अभय वारुळे, बबन काळे, राजू कराळे, अविनाश कडाळे, पोपट जाधव, अंकुश जाधव, विश्राम जाधव, चांगू पारधी, सिताराम पारधी, दत्ता काळे, शांताराम पारधी, विलास काळे, प्रकाश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वारुळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन वरूण भुजबळ, सतेज भुजबळ व सुजाता भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी केले.

Previous articleशिक्षक पदवीधर आमदार निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
Next articleशाळेची घंटा वाजली आठ महिन्यांनी “कभी खुशी ‘ कभी गम”