घोडेगाव मध्ये डेंग्यू रूग्णांची वाढती संख्या धोकादायक

सिताराम काळे, घोडेगाव

घोडेगाव (ता. आंबेगाव) शहर परिसरामध्ये डेंग्यु तापाने डोके वर काढले असुन दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. खाजगी दवाखाने डेंग्यु ग्रस्तांनी फुल्ल झाले आहेत. आपली जबाबदारी झटकण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळू नये, अन्यथा आंदोलन करावे लागेल असे लेखी निवेदन संबंधित ग्रामंपचायत व पंचायत समिती आरोग्य विभाग यांना सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बो-हाडे यांनी दिले आहे.

घोडेगाव व परीसरामध्ये सुमारे एक महिन्यापासून अंदाजे शंभर ते दिडशे नागरिकांना डेंग्यु किंवा डेंग्यु सदृश आजार झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेली आठ महिने लोकांना काम नसल्याने ते आर्थिक संकटात असतानाच त्यांना या आजारासाठी प्रत्येकी विस ते पंचविस हजार रूपये खर्च झाले आहे. याबाबत लोकांच्या जीवाशी खेळ नये, आपण आपली जबाबदारी झटकण्यासाठी लॅब मालक व संबंधित डॉक्टर यांच्यावर दबाव टाकू नये त्यांनी रूग्णांवर वेळेत उपचार केले आहे. आपण या आजाराची दखल घेतली नाही तर आंदोलन करावे लागेल असे लेखी निवेदन पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घोडेगाव व ग्रामपंचायत काळेवाडी-दरेकरवाडी यांना सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बो-हाडे यांनी दिले आहे.

बिसिमिल्लाह बिग्लिंग, विठ्ठल मंदिर चौक, कासार गल्ली, अजिंक्य तारा चौक, महाराणी चौक, साईनाथ चौक आदि घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये डेंग्यु ग्रस्त रूग्ण आहेत. तर आंबेडकर रोड, एसटी स्टॅंड परिसरात मोठया प्रमाणात प्लॅस्टिक, झाडे झुडपे, घाण, सांडपाणी, मलमुत्र पाणी, केरकचरा आदिंमुळे घाणीचे साम्राज्य उभे राहिले आहे. अशीच परिस्थिती घोडेगाव मध्ये बहुतेक ठिकाणी आढळून येत आहे. ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीत पुर्णपणे कोठेही धुळफवारनी, परिसर स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत डेंग्यु तापाने एखादया नागरिकाची जिवितहानी होण्याची वाट पहाते की काय? अशी संतप्त प्रतिक्रीया नागरिकांमध्ये उमटु लागली आहे.

Previous articleनारोडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी स्वप्निल पिंगळे यांची बिनविरोध निवड
Next articleघोडेगाव:-आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा-आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे या़ंचे आवाहन