नारोडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी स्वप्निल पिंगळे यांची बिनविरोध निवड

सिताराम काळे घोडेगाव

नारोडी ( ता.आंबेगाव ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्निल शंकरराव पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक मोहन गर्जे यांनी दिली.

उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सरपंच कैलास काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत स्वप्निल पिंगळे यांची उपसरपंचपदी निवड झाली. याप्रसंगी शिवसेनेचे शाखाप्रमुख संदिप पिंगळे, अविनाश घोडेकर,नवनाथ हुले, सोपान हुले,तान्हाजी जंबुकर,बाळासाहेब पिंगळे, प्रसाद काळे, अमोल विधाटे, सोमनाथ हुले,संतोष हुले,गणेश हुले,अभिषेक राजगुरू व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Previous articleनिरगुडसर येथे विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारांची चोरी ; शेतकऱ्यांचे दीड लाखाचे नुकसान
Next articleघोडेगाव मध्ये डेंग्यू रूग्णांची वाढती संख्या धोकादायक