पोंदेंवाडीत ज्वारीच्या शेतात जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले, एकजण फरार

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोंदेवाडी गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत जुगार खेळणाऱ्या २४ जणांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे ४ लाख ७९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेशानुसार पो. ना. दिपक साबळे, पो.हवा .विक्रमसिंह तापकीर , पो.कॉ. संदीप वारे , पो.कॉ.निलेश सुपेकर हे मंचर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असताना पो. नि. पद्माकर घनवट यांना गोपणीय बातमीदारामार्फत मौजे पोंदेवाडी गावच्या हददीत डिंभे उजवा कालव्याच्या बाजूला संतोष दौंड यांच्या शेतात काही इसम तीन जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाली.माहिती मिळताच त्यांनी पो.हवा . तापकीर यांना कळवुन त्या ठिकाणी छापा मारण्यास सांगितले.

या बाबत मंचर पोलीस ठाण्याचे पो. नि. कृष्णदेव खराडे आणि पो. उपनि. खबाले यांना कळवुन सदर ठिकाणी छापा मारण्यासाठी पोलीस स्टाफ व दोन पंच घेऊन स्था.गु.शा पुणे ग्रामीणचा पोलीस स्टाफ व मंचर पोलीस घटनास्थळी गेले त्यावेळी कालव्याच्या बाजूला संतोष दौंड यांच्या ज्वारीच्या शेतात २४ जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते.

या प्रकरणी नवनाथ ज्ञानेश्वर थोरात ( वय ४३ रा.मंचर ता.आंबेगांव ),रूपेश भाऊसाहेब इंदोरे ( वय ३७,रा.अवसरी खुर्द ता .आंबेगांव ), बाबु उर्फ सचिन अर्जुन करंडे ( वय ३० , रा.भोकरवाडी ता.आंबेगांव ), विशाल नामदेव जाधव ( वय २६ ,)सतिष नानाभाऊ रणपिसे ( वय ३५) सोमनाथ भगवान गायकवाड ( वय ३२),आदीनाथ बाळासाहेब गायकवाड ( वय ३४),मनोहर महादेव दौंड ( वय ३३) ,रमेश केशव बांगर (वय ३४ ), विनायक दत्तात्रय हारके ( वय ३२ , सर्व रा .पोंदेवाडी ता.आंबेगांव ) विजय धनसिंग चव्हाण वय ३७ ( रा.शिंगवे पारगांव ता.आंबेगांव ) दत्तात्रय बाबुराव धरम ( वय ६२ , रा . पारगांव कारखाना ता.आंबेगांव) म्हातारबा नामा कापडी ( वय ६० रा.जारकरवाडी ता.आंबेगांव ) जयसिंग बाबाजी इचके ( वय ५५ रा.गणेशनगर,कवठे यमाई ता.शिरूर ) विकास बगाराम गुळवे वय ३२ ,रा . मांजरवाडी ता. जुन्नर ), बाळु नाथु पवार ( वय ५४ रा .कवठे यमाई ता .शिरूर ) विलास भिमाजी बागडे ( वय ५० वर्षे रा.पारगांव कारखाना ता.आंबेगांव जि.पुणे ), सावकार गोविंद भोर ( वय ३९ वर्षे रा . कवठे यमाई ता.आंबेगांव ), विकास कारभारी पवार ( वय ३२ वर्षे ,रा.कवठे यमाई ता . आंबेगांव ),सुरेंद्र शांताराम इंदोरे ( वय ३४ रा .अवसरी खुर्द ता . आंबेगांव ), शांताराम खंडु कापडी ( वय ६३ रा .पारगांव ता . आंबेगांव ), नामदेव दादाभाऊ जाधव (वय ५१ रा .पोंदेवाडी ता . आंबेगांव ) यांना ताब्यात घेतले आहे. तर किसन निवृत्ती टाव्हरे ( रा .लाखणगांव ता.आंबेगांव ) हा पळुन गेला आहे .

घटनास्थळावरून पोलिसांनी ५९,१९० रुपयांची रक्कम ,तर एक चारचाकी मारुती सुजूकी एर्टीगा, एक मारुती सुजूकी झेन, तर विविध कंपनीच्या बारा दुचाकी असा एकूण ४ लाख ७९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर आरोपींना मंचर पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह ताब्यात घेतले असून याबाबत पो. ना. दिपक साबळे यांनी फिर्याद दिली आहे.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पो.अ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. नि. पद्माकर घनवट यांच्या आदेशानुसार पो.हवा. विक्रम तापकीर पो.ना. दिपक साबळे,पो.कॉं. संदिप वारे,पो.काँ. निलेश सुपेकर तसेच मंचर पो.स्टे पो.नि. कृष्णदेव खराडे, पो. उपनिरीक्षक सागर खबाले , पो.ना. निलेश खैरे ,पो.ना.अजित मडके ,पो.कॉ .सोमनाथ वाफगांवकर ,पो.कॉ.संदेश काळडोके ,पो.कॉ.सुदर्शन माताडे,पो.कॉ.मंगेश लोखंडे यांनी केली

Previous articleसामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने जरेवाडी गावच्या शिवरस्त्याचे काम मार्गी
Next articleनिरगुडसर येथे विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारांची चोरी ; शेतकऱ्यांचे दीड लाखाचे नुकसान