सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने जरेवाडी गावच्या शिवरस्त्याचे काम मार्गी

बाबाजी पवळे,राजगुरुनगर-खेड तालुक्यातील जरेवाडी गावच्या शिवरस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी होत होती परंतू संबंधित विभागाने कामाला तांत्रिक अडचण सांगितली जात होती.त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होता. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी या रस्त्याची दयनीय अवस्था बघून रस्त्यावर स्व खर्चाने मरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे, तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे, झुडपे  काढणार असल्याने नागरिक शेतकरी व वाहनधारकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे .

येत्या काही दिवसात डांबरीकरण करून कायमस्वरूपी रस्त्याचे काम करण्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्य काळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली .

यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच अशोक जरे ,माजी सदस्य कुंडलिक जरे,यशोदा सामाजिक संस्था अध्यक्ष संस्थापिका छावा मराठा युवा महासंघ प्रदेश महिला अध्यक्ष रूपाली राक्षे,समवेत सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जरे,भाजपा युवा नेते निलेश जरे शिवसेनेचे उपविभागप्रमुख अंकुश जरे,सामाजिक कार्यकर्ते काळुराम करंडे, स्थानिक शेतकरी वसंत जरे, होमादाजी जरे, भाजप शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दामोदर राक्षे आदि उपस्थित होते .

Previous articleमहात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रावसाहेब पवार तसेच स्वागताध्यक्षपदी सुनील धीवार
Next articleपोंदेंवाडीत ज्वारीच्या शेतात जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले, एकजण फरार