चोरून वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मंचर पोलीसांची कारवाई

प्रमोद दांगट,निरगुडसर

पोंदेवाडी ते धामणी रोडवर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन ब्रास वाळू व वाळू वाहतूक करणारा टिप्पर ताब्यात घेतले आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार एस.पी.मुळूक व पोलिस कॉन्स्टेबल आर.डी.तांबे हे मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि १९ रोजी रात्री १० वाजलेच्या सुमारास लोणी धामणी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोंदेवाडी लोणी धामणी रोडवर एक पिवळ्या रंगाचा टिप्पर एम.एच.१४ डी. एम.८१३४ उभा असलेला दिसला पेट्रोलिग करणाऱ्या पोलिसांनी टिपरची तपासणी केली असता त्यामध्ये गौजखनिज तिन ब्रास वाळू आढळून आली याबाबत वाहनचालकास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने संतोष सुभाष पडवळ ( वय ३० वर्ष रा संविदणे ता शिरूर जि पुणे) असे सांगितले व त्याचे बरोबर असलेला किन्नर अर्जुन चिलाराम जाधव ( वय ३० रा.कवठे यमाई ता.शिरूर जि पुणे ) असे सांगितले या टिप्परचा चालक व मालक आपण असल्याचे पडवळ यांनी सांगितले तसेच ही वाळू कोठून आणली आहे असे विचारले असता त्यांनी ही वाळू लाखणगाव येथील घोडनदीमधून आणली असल्याचे सांगितले.याबाबत त्यांच्याकडे वाळू वाहतूक परवान्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे तहसीलदार यांचा वाळूचा परवाना नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी २४,००० हजार रुपये ची तीन ब्रास वाळू व ७ लाख रुपये किंमतीचा टिप्पर जप्त केला आहे.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल यशोदिप वंजारी यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleमहसूल विरोधातील ग्राहक पंचायतीच्या साखळी आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
Next articleखळबळजनक -सापाला मारून जाळल्याने तिघांवर गुन्हा दाखल