महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

चाकण-महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने चाकण शहरात बालवीर स्पोर्टस् क्लब चाकण आयोजित दुर्गा माता कलामहोत्सव वतिने भव्य रांगोळी स्पर्धा चे आयोजन केले होते त्याचा बक्षिस वितरण समारंभ (दि.१७) रोजी पार पडला प्रथम क्रमांक फ्रिज ,दुसरा नंबर स्मार्ट टिव्ही, तिसरा क्रमांक वाॅशिग मशिन, चौथा क्रमांक मायक्रो ओहन, पाचवा क्रमांक कुलर बक्षिस दिले सहभागी प्रत्येक स्पर्धकाला बक्षिस दिले.यावेळी अंसख्य महिला उपस्थित होत्या.


या कार्यक्रमाचे आयोजन अभयदादा वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी मनसेचे खेड तालुकाध्यक्ष संदिपदादा पवार, वाहतुक जिल्हाध्यक्ष बसप्पा वळसंगे,रस्ते अस्थापनाचे अविनाश लोखंडे व दत्ता परदेशी अनेक चाकण व अंळदी शहरातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमचे आयोजन सुदर्शन गायकवाड , विक्रम भालेराव, भानुदास सागर, मोहीत साबळे, ॠशिकेश वाव्हळ, सारंग साखरकर,अदित्य गोरे मुकेश देवकर, सिमाताई येळवडे, ज्योती पाटील,भाग्यश्री शिंदे , संयोगिता परदेशी, मुस्कान पठाण, नम्रता नरुटे, संकेत येळवडे इत्यादी कार्यकर्त्यांनी केले. यावेळी अंसख्य महिलांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे पक्ष प्रवेश केला
चाकण शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवून मनसे चाकण शहरात अभय वाडेकर याच्या नेतृत्वाखाली चाकण नगरपरिषद लढवणार असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पदाधिकाऱ्यांनी सागितले

Previous articleधामणे-कोये शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड ; “बेंटली” कडून मिळाले संगणक साहित्य !
Next articleदौंड मध्ये गोरगरीब जनतेला फराळ वाटप