धामणे-कोये शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड ; “बेंटली” कडून मिळाले संगणक साहित्य !

Ad 1

राजगुरुनगर- धामणे व कोये (ता.खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना बेंटली अॅडव्हान्सिंग इन्फास्ट्रक्चर स्टेम ग्रॅन्ट २०२० कडून प्रत्येकी साधारण सव्वा लाख रुपये किमतीचे संगणक साहित्य मिळाले असल्याची माहिती धामणे शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.

पुणे येथील ‘बेंटली’ या समाजसेवी संस्थेने कोये व धामणे शाळांची गुणवत्ता व गरज ओळखून हि मदत केली आहे.
दोन्ही शाळांना प्रत्येकी एक ओव्हरहेड प्रोजेक्टर, सी.पी.यु. माॅनिटर, की बोर्ड, माऊस, यु.पी.एस. साऊंड असे साधारण सव्वा लाख रुपये किमतीचे संगणक साहित्य भेट म्हणून मिळाले आहे. शिवाय यामध्ये सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे.

याकामी प्रथमेश कालेलकर, शिक्षकनेते बाळासाहेब कानडे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे, आदर्श शिक्षक संतोष थोरात, धामणे शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज पवळे, कोये शाळेचे मुख्याध्यापक लालू आंबेकर यांनी पाठपुरावा केला.

गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विस्ताराधिकारी रोहिदास रामाणे,कोये-धामणे शाळेचे शिक्षकवृंद मारुती जरे, रामदास गिधे,अनिल बोर्‍हाडे, अशोक सावंत,अमर केदारी, कल्याण पिंगळे, तुकाराम डांगले, सिमा गायकवाड, मंगल निमसे-पिंगळे, नीता शिंदे आणि कोये-धामणे ग्रामस्थ व पालकांनी ‘बेंटली’ ला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले.