रोहकलच्या सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

चाकण- रोहकल गावचे सरपंच अमृत सुरेश ठोंबरे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सात पैकी पाच सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

याबाबत अर्जदार व त्यांचे दावेदार यांच्या वकिलांनी लेखी व तोंडी युक्तीवादानुसार, केला होता त्यानुसार मा.जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व तपशील समजावून घेतली त्यानुसार अर्जदार यांचे म्हणणे आहे की, त्यांनी स्वत:हुन सरपंचपदाचा राजीनामा योग्य त्या सक्षम अधिका-याकडे सोपविलेला होता. त्याबाबतचे वृत्त वेगवेगळ्या दैनिक वृत्तपत्रामध्ये देखील प्रसिध्द झालेले होते. परंतु अर्जदार यांची बदनामी करण्याच्या एकमेव उद्देशाने चुकीचा व बेकायदेशीर अविश्वास ठराव जाब देणार यांनी स्वत:च्या फायदयासाठी अस्तित्वात आणलेला आहे.तसेच अधिनियमानुसार सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या निवडणूकीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीची मुदत समाप्त होणा-या दिनांकाच्या लगतपुर्वी सहा महिन्यांच्या आत असा कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाणार नाही अशी सुधारणा केलेली आहे. मौजे रोहकल ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या ७ इतकी आहे. सरपंचा विरुध्द दाखल अविश्वास ठराव मंजूर होणेसाठी एकुण सदस्यांच्या ३ / ४ म्हणजेच कमीत कमी ६ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते. तथापी ५ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे बहुमता अभावी सदरचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे.सरपंचांवर अविश्वास आणताना तीन चतुर्थांश मतांची आवश्यकता असल्याने तांत्रिकदृष्ट्या आवश्यक तेवढा कोरम पूर्ण होऊ न शकल्याने हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला.

गावात विविध विकास कामे प्रामाणिक पणे पार पाडत असताना पदाच्या मोहापायी काही सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने अविश्वास प्रस्ताव पास केला परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास होता व आज न्याय झाला.पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन गावात विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा माझा प्रयत्न असेल-अमृत ठोंबरे,सरपंच रोहकल

Previous articleशिव संस्कार सृष्टी व पर्यटनाला चालना देणार – खा.डॉ.अमोल कोल्हे
Next articleअल्पवयीन मुलींना फुस लावुन पळवुन नेणा-या चौघांवर गुन्हा दाखल