वाहतूक पोलीसांना फराळ वाटप

Ad 1

चाकण-दिवाळी सणाच्या निमित्ताने व कोरोनाच्या यशस्वी लढ्यात केलेल्या कामगिरी बद्दल वाहतूक पोलीसांना दिवाळीचा फराळ वाटप करून दिवाळी गोड करण्यात आली.

उद्योजक रूपेश येळवंडे, उद्योजक मनोज वाळके व अँड. प्रविण पडवळ यांनी दर वर्षी प्रमाणे या वर्षीही चाकण एमआयडीसीतील आंबेठाण चौक,चाकण चौक ,आळंदी फाटा,महाळुंगे चौकी,एचपी चौकातील सर्व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळीचा फराळ वाटप केला.

समाजासाठी आपण काही देणं लागतो या भावनेतून जनसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवून समाजाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत घेतलेला समाजसेवेचा वसा असा सुरू ठेवणार असल्याचे उद्योजक रूपेश येळवंडे यांनी सांगितले