दौंड तालुका बिगरशेती नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्रीराम यादव यांची बिनविरोध निवड

Ad 1

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका बिगरशेती नागरी पतसंथा पाटस या संस्थेच्या चेअरमन पदी श्रीराम दिलीप यादव तर व्हा.चेअरमन पदी संजय जाधव यांची रमेश अप्पा थोरात यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच संचालक पदी युवा नेते तुषार दादा थोरात यांची निवड करण्यात आली.

निवडी वेळी रमेश थोरात,बाजार समिती सभापती दिलीप भाऊ हंडाळ,पंचायत समिती उपसभापती नितीन भाऊ दोरगे,आप्पासाहेब कोरहाळे,विक्रांत भैय्या गायकवाड,संस्थेचे सचिव सूर्यकांत खैरे ,भरत शीतोळे,भाऊसाहेब वाघमोडे,सर्व संचालक ,कर्मचारी,उपस्थित होते.

पुर्व भागातून एका समान्य आणी प्रामाणिक कार्यकर्त्याला त्याच्या कामाच्या जोरावर अप्पा नी संधी दिली याचे जनते मधे खुप समाधान व्यक्त होत आहे.
श्रीराम यादव यांच्याशी बातचित केली असता ते म्हणाले की भविष्यात रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते तुषार थोरात यांच्या सहकार्याने सर्व संचालक मंडळी सोबत संस्थेची भरभराट कशी होईल याला प्राधान्य दिले जाईल,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सर्व संचालक मंडळाच्या विश्वासाने थोड्याच दिवसात संस्थेचे तालुक्यात नाव होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल.