सुभाष भोसले यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या दौंड तालुकाध्यक्ष पदी निवड

Ad 1

दिनेश पवार,दौंड

महाराष्ट्र वारकरी महामंडळ च्या दौंड तालुका अध्यक्षपदी हिंगणीबेर्डी येथील सुभाष विठ्ठल भोसले यांची निवड करण्यात आली,महामंडळ चे अध्यक्ष ह.भ.प कृष्णाजी महाराज रांजणे,कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री,सचिव रेवजी महाराज वाळुंज,अध्यक्ष सतीश महाराज काळजे,विभागीय अध्यक्ष जीवन मामा खानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे,.

या निवडीबद्दल सुभाष भोसले यांचा सन्मान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,सुभाष नागवे,पंचायत समिती उपसभापती नितीन दोरगे,देऊळ राजे चे मा.सरपंच अमित गिरमकर यांच्या हस्ते करण्यात आला,वारकरी महामंडळ च्या वतीने समाजातील तरुणांना सकारात्मक विचार देऊन सक्षम बनवणे,अध्यात्म विचारा बरोबरच भविष्यात स्वावलंबी व सुसंस्कृत गुण रुजवण्यासाठी काम करणार असल्याचे सुभाष भोसले यांनी यावेळी सांगितले.