बाबू पासलकर यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड

Ad 1

दिनेश पवार,दौंड

सूचना का अधिकार कार्यकर्ता असोसिएशन संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता समिती  महाराष्ट्र राज्य च्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी बाबू नारायण पासलकर यांची निवड करण्यात आली,समाजातील सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क मिळवून देणे,शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती अधिकार कायद्याची ओळख करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून,देण्यासाठी तसेच समिती चे ध्येय,धोरण नि कार्य सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व सभासदांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे बाबू पासलकर यांनी सांगितले.ही निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साईनाथ नागनाथ शिंदे,संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य चे संजय विठ्ठलराव परसे, सहसंपर्क महाराष्ट्र राज्य अजिनाथ विष्णू आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या निवडीबद्दल बाबू पासलकर यांचा सन्मान राष्ट्रीय मानवाधिकार संघ भारताचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक खैरे,पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष दस्तगिर इनामदार,कुंभार सेवा समाजाचे तालुका अध्यक्ष सुरेश कुंभार,रामभाऊ शेडगे,भरत गिरमकर, बाळू पासलकर, प्रकाश भाऊ ढवळे,पत्रकार आप्पासाहेब पवार,प्रशांत वाबळे,राहुल आवचर,जयवंत गिरमकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल कोल्हे तसेच उपस्थित नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला

Previous articleBREAKING – काळूस येथे २१ वर्षीय युवकाचा खून
Next articleसुभाष भोसले यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या दौंड तालुकाध्यक्ष पदी निवड