सुरेखाताई मोहिते पाटील व निर्मलाताई पानसरे यांनी खंडोबा व यमाई देवीचे घेतले दर्शन

Ad 1

राजगुरूनगर- कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल ८ महिन्यांनी महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी मंदिरांचेखुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप (आण्णा) मोहिते पाटील यांच्या सौभाग्यवती मा.जिल्हा परिषद सदस्या सौ. सुरेखाताई मोहिते पाटील तसेच पुणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा सौ . निर्मलाताई पानसरे यांनी श्री क्षेत्र निमगाव येथील खंडेरायाचे तसेच कनेरसर येथील यमाईमाताचे दर्शन घेतले.

यावेळी खेड तालुका राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर, बाजार समितीचे सभापती विनायकशेठ घुमटकर ,मा.जिल्हा परिष सदस्य अरुणशेठ चांभारे, महाराष्ट राज्य पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पा, अँड सुखदेवतात्या पानसरे, शहराध्यक्ष सुभाषशेठ होले, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष बबनराव शिंदे, खेड तालुका राष्टवादी युवक उपाध्यक्ष महेंन्द काळे ,मा ग्रामपंचायत सदस्या सारिकाताई राऊत , शुभांगीताई शिंदे , रुपालीताई भालेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर गोरगल्ले , भगवान शिंदे , बाबाजीशेठ कोठावळे दशरथ वायकर, प्रमोद काळे, बाबुराव काळे यांच्या सह निमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.