डेहणे येथे रक्तदान शिबीर संपन्न,सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदानाचा अभिनव उपक्रम

Ad 1

राजगुरूनगर-देशभरात कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या काळात अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुडवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने शक्य असल्यास रक्तदान करावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. हीच बाब लक्षात घेऊन खेड तालुक्यातील भिमाशंकर परीसरातील तरुणांनी रक्तदानाचा अभिनव उपक्रम केला आहे.

अवघे जग कोरोना या आजाराशी लढत असतां, भारतासह महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला हरवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण सरसावले आहेत.

पिंपरी चिंचवड येथील मोरया ब्लड बॅक”रक्तपेढीच्या सहकार्याने भिमाशंकर परिसरातील डेहणे या ठिकाणी खेड तालुक्यातील युवा सरपंच,उपसरपंच तसेच पोलिस पाटील मुंबई,चाकण,पुणेकर यांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

परिसरातील तरूणांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी जवळपास ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला परिसरातील अनेक नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी संयुक्त ग्रामपंचायत धुवोली वांजाळे उपसरपंच शरद जठार,विजय कोरडे (विशेष कार्यकारी अधिकारी), डेहणे उपसरपंच शंकर कोरडे,धुवोलीचे पोलिस पाटील बाळासाहेब थोरात,पाबे पोलीस पाटील संदिप कोकाटे, शेंदुर्ली बळीराम गायकवाड,प्रदिप कौदरे, विशाल पोखरकर (ग्र.पं. सदस्य,वाळद ) शरद पोखरकर,संदिप कौदरे,संपत कौदरे,युवराज वाघमारे, नंदकुमार गोपाळे (सा.कार्यकर्ते),अमर कोरडे (PSI), गणेश कोरडे,अरविंद सावंत, सचिन जठार, प्रा.गणेश हुरसाळे, आयाज तांबोळी (पञकार),अमोल कोरडे, सुनिल मिलखे, काळुराम कौदरे, लहु वाजे,बाळासाहेब सावंत, दास सोळसे, सुशांत सावंत यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.