भिमाशंकर परीसरामध्ये पोलिस बंदोबस्त तैनात

बाबाजी पवळे – श्री क्षेत्र भिमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सचे पालन करून तोंडावर मास्क लावावे. दर्शन झाल्यानंतर इतर कोठेही रेंगाळत थांबु नये, गर्दी करू नये, पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी केले.

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे भिमाशंकर परीसरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांना एमटीडीसी व बसस्थानकाजवळच थांबवले जात आहे. मंदिराजवळ भीमाशंकर आराखडयातील नियोजनानुसार भीमा नदीपात्राचे काम सुरू असल्याने खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरात जास्त भाविकांना थांबता देखिल येणार नाही.

श्री क्षेत्र भीमाशंकरच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दोन ते तिन भविकांनाच गाभा-यात प्रवेश देण्यात येत आहे. शासन नियमाप्रमाणे पवित्र शिवलींगास स्पर्श न करता भाविकांना दर्शन दिले जात आहे. भीमाशंकर देवस्थान येथे सर्व शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे भाविकांना दर्शन देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Previous articleश्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले
Next articleडेहणे येथे रक्तदान शिबीर संपन्न,सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदानाचा अभिनव उपक्रम