ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

Ad 1

दिनेश पवार,दौंड

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा ग्रामीण भागात चांगलाच फायदा होत आहे, रात्री,अपरात्री घडणाऱ्या घटनेविषयी एकाचवेळी परिसरातील सर्व नागरिकांना समजते यामुळे सर्व सावध राहतात नि होणारे अनर्थ टाळले जात आहेत, असाच प्रकार बोरिबेल मध्ये घडला चोर चोरी करण्याच्या उद्धेशाने आले खरे पण खबर ग्रामसुरक्षा द्वारे सर्वांना मिळाल्याने सर्व सावध झाले,पोलीस ही तप्तर हजर झाले नि चोरानी मात्र पोबारा केला.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीबेल तालुका दौंड जिल्हा पुणे येथील पोटेवस्ती येथे आज पहाटे 3 च्या सुमारास श्री.ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत यांच्या घरावर 3-4 चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसेच श्बा  पोटे यांच्या पिकअप गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत आहेत हे कळताच बोरीबेल गावच्या पोलीस पाटील श्रीमती अर्चना अमोल सोनवणे यांचे पती डॉ. श्री. अमोल सोनवणे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबर वरून (18002703600) संपूर्ण गावाला ही माहिती कळवली असता गावातील लोक व पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.