डॉ. मणिभाई देसाई महान देशभक्त – जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

विविध धर्म ग्रंथ वाचतांना योगी, महर्षी तपस्वी, ऋषी असे शब्द आपणाला वाचताना आढळतात अशीच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व उरुळी कांचन (ता.हवेली) येथे वास्तव्यास होते ते म्हणजे डॉ.मणिभाई भिमभाई देसाई हे नाव, महात्मा गांधीजींचे अखेरची शिष्य परंतु जहालमतवादी, मॅगसेसे अवॉर्ड विजेते, क्रांतीचे जनक दुग्धगंगेचे भागीरथी, महान क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर, पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई यांनी विविध क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला गीतेतील निष्काम कर्मयोगीसमान जगले मनिभाई देसाई थोर देशभक्त होते. राष्ट्रसेवेचे ज्वलंत उदाहरण होते असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.

पद्मश्री डॉ मणिभाई देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बोलताना वरील उदगार डॉ रवींद्र भोळे यांनी काढले पुढे बोलताना भोळे म्हणाले,की महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत व मनीभाई देसाई यांचे वास्तव्य लाभलेल्या उरळी कांचन येथे एक महान योगी होऊन गेलेत, मणिभाई देसाई यांचा जन्म २७ एप्रिल १९२०रोजी गुजरात राज्यात झाला व स्वर्गवास १४ नोवेंबर १९९३ ला महाराष्ट्रात उरळीकांचन येथे झाला. राष्ट्रहितासाठी कार्यरत राहणे, ग्रामीण सुधारणा करणे, जनतेचे दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हे कार्य केल्यास मणीभाईजी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

मॅगेसेस अवार्ड विनर ,महात्मा गांधीजींचे शेवटचे शिष्य ,जहाल क्रांतिकारी,महान देशभक्त,स्वतंत्र सेनानी,स्वेतक्रांतीचे जनक, दुग्धगंगेचे भगिरथी ,जागतिक समाजसेवक,पद्मश्री डॉ मणीभाई भीमभाई देसाई यांना पुण्यतिथीच्या पवित्र दिनी,शंभर वर्षे पुर्ण पूर्ण झाल्या बद्दल भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली यावेळी प्रमुख डॉ रविंद्र दि भोळे( समाजसेवक, प्रवचन्कार, अपंगसेवक)संस्थापक अध्य्क्ष् डॉ मणीभाई देसाई प्रतिस्थान एन वाय के युवा कल्याण ,क्रिडा मंत्रालय दिल्लीaffi,डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट एन वाय के क्रिडा युवक कल्याण मंत्रालय दिल्ली affi,NITI आयोग दिल्ली मान्यतप्राप्त,ISO मान्यतप्राप्त संस्था ,राज्यस्तरीय अनेक संस्थात्माक कार्य , निस्काम कर्मयोगी कार्यकर्ता महाराष्टराज्य हे होते.

Previous articleमराठी साहित्य संमेलन यंदा साधेपणाने साजरे करणार- दशरथ यादव
Next articleग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे चोरीचा प्रयत्न फसला