मराठी साहित्य संमेलन यंदा साधेपणाने साजरे करणार- दशरथ यादव

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (दि.२८) नोव्हेंबर रोजी खानवडी (ता. पुरंदर) येथे साधेपणाने साजरे करण्यात येणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितली.

दरवर्षी महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी (ता.पुरंदर) येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाचे हे चौदावे वर्षे आहे.
संमेलनाच्या संयोजनसाठी आयोजित केलेल्या बैठकीला मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, साहित्य मित्र गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, सुनील लोणकर, संमेलनाचे प्रसिध्दी प्रमुख दत्ता भोंगळे, पश्चिम निरिक्षक विजय तुपे, दत्ता कड आदी उपस्थित होते.

संमेलनात उद्घाटन समारंभ, कविसंमेलन, परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते होणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात येणार असून वर्षभर विविध साहित्यिक व सामाजिक कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येणार आहेत. गेली तीस वर्षे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात मोलाची भर घालून कऱ्हा नदीच्या काठी साहित्याची ज्योत तेवत ठेवली. राज्यभर विविध साहित्य संमेलने व कवी संमेलन घेवून गावो गावच्या कविना संधी मिळवून दिली. कविता, गाणी, सिनेमा आणि व्याख्यानातून प्रबोधनाचे काम त्यांनी केले. सासवडला झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा मोलाचा सहभाग होता. असे राजाभाऊ जगताप यांनी सांगितले.

Previous articleसोरतापवाडी येथील भटक्या समाजातील कुटुंबाना सौरदिवे देऊन आगळी वेगळी दिवाळी साजरी
Next articleडॉ. मणिभाई देसाई महान देशभक्त – जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे