सोरतापवाडी येथील भटक्या समाजातील कुटुंबाना सौरदिवे देऊन आगळी वेगळी दिवाळी साजरी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता.हवेली) येथील भटक्या समाजातील १५ कुटुंबाला सौर दिवे आणी मिठाई देऊन आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे फडतरे यांच्या हस्ते या कुटुंबाला ही दिवाळी भेट देण्यात आली.

आर आर शिंदे कॉलेज चे ९४ सालच्या माजी विध्यार्थी आणि शारदाश्रम फौंडेशन याच्या विद्यमाने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. भटक्या जमातीतील लोकांना कायम विविध ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी जावे लागत असल्याने त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही म्हणून विजेची सोय म्हणून या समाजातील लोकांना सौर दिवे संयंत्र देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना रोहिणी आखाडे फडतरे यांनी अशा समाजातील लोकांना शासकीय सुविधा उपलब्ध करुन देताना जाणवणाऱ्या कागदपत्रांची उणीव दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

यावेळी पोतराज समाजातील मुलांना सौरदिवे कसे जोडावे यांचे प्रशिक्षण शारदाश्रम फौंडेशनचे अध्यक्ष सचिन धांडे यांनी दिले.

या वेळी हृदयरोग तज्ञ डॉ. स्वप्नील कर्णे ,वकील स्मिता निकम, मधुरा देशपांडे, बाळासो जरांडे, माजी उपसभापती तानाजी चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष भाजप सुदर्शन चौधरी , माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी ,माजी उपसरपंच गणेश चौधरी, प्रांजली चौधरी, ग्रामविस्तार अधिकारी संतोष नेवसे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.