खळबळजनक..मुलीच्या बदल्यात मुलगी पळवली

राजगुरूनगर : आमची मुलगी आणुन द्या..आणि तुमची घेऊन जा’ मुलीच्या बदल्यात मुलगी पळवुन नेल्याचा खळबळजनक प्रकार खेड तालुक्यातील आंभु (ता.खेड ) येथे घडला आहे.या घटनेबाबत एका महिलेसह दोन पुरुषांना पोलिसांनी अटक  केली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार लग्न करण्याच्या उद्देशाने कोथरूड (पुणे) येथील राणी भेलके यांची मुलगी आंभु येथील तुषार क्षिरसागर यांने काही दिवसापुर्वी पळवून नेली होती. राणी भेलके इतर इसमांनी आंबु (ता खेड ) दि १३ रात्री ९ वाजता या युवकाचा मामा नारायण आतकर यांच्या घरी जाऊन तुमचा नातू तुषार क्षिरसागर कोठे आहे. लवकर सांगा नाहीतर तुम्हाला ठार मारू अशी धमकी देऊन भेलके यांच्या बरोबर इतर आलेल्या इसमांनी तलवारीचा धाक दाखवून घरातील भांडी फोडली व आतकर कुटुंबियांना धक्काबुक्की केली. तसेच आतकर यांची १५ वर्षाची नात हिला राणी भेलके यांनी केस धरून फरफटत नेऊन आमची मुलगी आणून द्या तुमची मुलगी घेऊन जा, असे म्हणून चारचाकी गाडीत बळजबरीने घेऊन नेले होते. या घटनेनंतर भेदरलेल्या आतकर कुटुंबीयांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली हकीगत सांगितली होती .तसेच सुशीला नारायण आतकर (वय ५० ) रा. आंबु ( ता खेड )यांनी खेड पोलिस ठाण्यात मुलगी पळवून नेल्याची फिर्याद दिली होती.

खेडचेपोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी तातडीने हालचाल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पोलीस हवालदार शेखर भोईर बाळकृष्ण साबळे, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, प्रवीण गेगेंजे याच्या पथकाने कोथरुड गाठले .आंभु येथुन पळवुन नेलेली मुलगी पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला आतकर कुटुंबाच्या स्वाधीन केले. तसेच तीला जबरदस्तीने पळवुन नेणारी राणी भेलके व दोन इसमांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पहिली पळुन गेलेली मुलगी,पळवुन नेणारा मुलगा यांच्या बद्दल अद्याप माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांची वाळूमाफियावर मोठी कारवाई
Next articleसोरतापवाडी येथील भटक्या समाजातील कुटुंबाना सौरदिवे देऊन आगळी वेगळी दिवाळी साजरी