पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची वाळूमाफियावर मोठी कारवाई

Ad 1

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने दौंड तालुक्यातील पूर्व भागात वाळू माफियांवर मोठी कारवाई केली आहे, या करवाईमध्ये 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे वाळू उपसा करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी नष्ट केले आहे केले आहे,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारतानाच आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अवैध धंदे व गुन्हेगारांवरती कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणे पंधरा दिवसांतच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे,.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दौंड तालुक्यातील पूर्व भागात वडगाव दरेकर,पेडगाव,देऊळगाव राजे,येथे भीमा नदी पात्रात फायबर बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे पोलिसांना समजले होते,त्यामुळे पोलिसांनी एक छोटी बोट घेऊन त्यामध्ये बसून फायबर बोटी ताब्यात घेतल्या,यामध्ये 6 बोटी व तीन सेक्शन मशीन असा एकूण 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचा मुद्धेमाल महसूल कार्यालयातील दोन अधिकारी यांच्या उपस्थित नष्ट करण्यात आल्या, या करवाईमध्ये दौंड चे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पो.ह.असिफ शेख,पांडुरंग थोरात, पो.नाईक.आण्णासाहेब देशमुख,पो.कॉन्स्टेबल अमोल गवळी,किरण राऊत,अमोल देवकाते, रवी काळे,किशोर वाघ, पो.ना.शैलेश रानसिंग व 6 होमगार्ड यांनी सहभाग घेतला सदर कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.