राजगुरुनगर बस स्थानकाची कर्मचाऱ्यांनी साफसफाई केल्याने प्रवासी व नागरिकांनी केले कौतुक

राजगुरूनगर-दिवाळी सण व कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथील बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी बस स्थानकाची साफसफाई करून पाण्याने धुऊन स्वच्छ केले आहे.

सध्या सुरू असलेला दिवाळी सणामुळे राजगुरुनगर बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढली असून कोणाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे म्हणून येथील आगार व्यवस्थापनाने राजगुरुनगर बस स्थानक हे प्रेशर पाईप लावून पाण्याने धुवून पूर्ण स्वच्छ केले आहे. आगार व्यवस्थापनाने केलेल्या या कामामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना प्रसन्न वाटत असून नागरिकांनी या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे .

बस स्थानक प्रमुख टी. एन.पवळे ,एम.डी.विटे,गौरव काळे ,लेखाकार दिघे सर,सर्व चालक ,वाहक,सफाई कामगार हेमंत कुंडीया यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांनी साफसफाई केली  असून यासाठी आगार व्यवस्थापक आर.जी.हांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleवसुबारसने दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात
Next articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांची वाळूमाफियावर मोठी कारवाई