शिरोली येथील श्री गौधन डेअरी फार्म मध्ये बसूबारस उत्साहात

Ad 1

राजगुरूनगर-बसूबारसचे औचित्य साधून शिरोली (ता.खेड ) येथील श्री गौधन डेअरी फार्म येथे गायपूजन करण्यात आली. यावेळी गोमातेचे पूजन कांताबाई टाकळकर यांच्या हस्ते देशी गीर गाई आणि वासराचे पूजन करण्यात आले.

वसुबारस निमित्त श्री गौधन डेअरी फार्म मधील गायींना भाजी,भाकरी व गोड लाडूचा नैवेद्य दिला,त्याचप्रमाणे गायींचे औक्षण करून मनोभावे पूजा केली.

यावेळी दिपाली टाकळकर, उज्वला आहेरराव यांच्या विशाल टाकळकर यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणजेस गाय आणि वासरांचे एकत्रित पुजन करण्यात येते. हिंदु धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे.गाईला माता मानणारी हिंदु संस्कृती आहे.आणि आता कोरोना संकट काळात देशभरातील मंदिरे बंद असल्यामुळे हिंदु समाज आज ज्या गाईच्या उदरात तेहतीस कोटी देवाचे वास्तव करतात अशा गोमातेचे पुजन करुन आपली मनोकामना पुर्ण होवो आणि देशावरील कोरोनाचे संकट कायमस्वरुपी दुर होवो यासाठी प्रार्थना केली असल्याचे श्री गौधन डेअरी फार्मचे संचालक श्रीपती टाकळकर यांनी सांगितले.