वाघोलीत समाज मंदिराचा वापर ‘ज्ञान’ दानासाठी

शाळा बंद असल्याने छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीने वस्तीत जाऊन मुलांना दिले जातेयं शिक्षण

गणेश सातव,वाघोली,पुणे

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातला असताना अनेक देशातील शाळा,महाविद्यालये कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बंद ठेवली आहेत.श्रीमंत,मध्यमवर्गीय आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी याकाळातही धडपड करत आहेत.अनेक पालकांनी मोबाईल,कम्प्युटर,खाजगी शिकवणीद्वारे घरीच आपल्या मुलांना शिक्षणासाठी सोय केली आहे.परंतु शहरासह ग्रामीण भागात असे काही लोक असतात कि त्यांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते.ते लोक कुठून आणणार खाजगी शिकवणी,मोबाईल संचासाठी पैसा ?

वाघोलीत राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या माध्यमातून बंद असलेली मंदिरं, समाजमंदीर, बुध्दविहार या़ंचा उपयोग अश्याच वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी होतोयं.वाघोलीतील वाघेश्वर नगर परिसरातील झोपडपट्टी भागात राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्ञानेश्वर तरुण मंडळाच्या हनुमान मंदिरात संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत या मुलांच्या शालेत शिकवणी बरोबरचं व्यक्तिमत्त्व व सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केला जात आहे.

इयत्ता ४ थी ते १० वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना या शिकवणीचा मोठा फायदा होत आहे.या शैक्षणिक प्रकल्पासाठी राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा.डि.बी.धावारे व त्यांचे सर्व सहकारी मोठे परिश्रम घेत आहेत.

Previous articleनिधन वार्ता – जयवंताबाई दांगट
Next articleशिरोली येथील श्री गौ धन डेअरी फार्म येथे बसूबारस उत्साहात