वेगरे च्या सरपंचपदी मिनाथ कानगुडे यांची बिनविरोध निवड

पिरंगुट – वेगरे (ता.मुळशी) येथील सरपंच पदाचे निवडणुकीत माजी सरपंच भाऊ मरगळे यांचे पॅनलमधील सदस्यांच्या पाठिंब्यावर मिनाथ मारुती कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली.

या ग्रामपंचायतीचे एकूण सात सदस्य असून यापैकी मरगळे यांच्या विचारांचे पाच सदस्य आहेत या सर्वांचे एकमत होऊन कानगुडे यांचे नावास पसंती दिली त्यामुळे विरोधी गटाकडे अर्ज भरण्यासाठी सुचक नसल्याने विरोधात अर्ज आला नाही त्यामुळे कानगुडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी आदर्श सरपंच भाऊ मरगळे व शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र गुंड यांनी विशेष प्रयत्न केले. निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने कानगुडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बावधने, सोनाबाई कोकरे, फुलाबाई ढेबे, मनीषा मरगळे ,उपसरपंच सुमनांजली आखाडे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, वैशाली सणस ,अनुप मारणे, श्याम धुमाळ, सतीश इंगवले ,संजय कानगुडे ,राजेंद्र उभे, नामदेव चौधरी, माजी सरपंच मारुती कानगुडे, भागुजी बावधने ,मलिक कोकरे, नवनाथ कानगुडे, संतोष आखाडे,अनंता रामभाऊ कोकरे तसेच कानडे यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने राजगुरुनगर येथील वृध्दाश्रमात मास्क व दिवाळी फराळ वाटप
Next articleनिधन वार्ता – जयवंताबाई दांगट