दुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने राजगुरुनगर येथील वृध्दाश्रमात मास्क व दिवाळी फराळ वाटप

राजगुरूनगर-सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व या कोरोनाच्या लढाईत वृध्दाश्रमातील वृध्दांची दिवाळी गोड व्हावी या हेतूनेच व दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे संस्थापक मामा शिंदे यांच्या प्रेरणेतून दुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी निमित्त राजगुरुनगर येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ, राजगुरुनगर शाखेतील स्वेच्छा निवृत्त कर्मचारी दिलीप पटवर्धन व सौ. सुनिताताई पटवर्धन संचलित स्नेह वानप्रस्थाश्रम ट्रस्ट या वृध्दाश्रमात जाऊन मास्क व दिवाळी फराळ यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी दुर्गाई हृदय प्रतिष्ठान चे मेंबर प्रशांत गोलांडे, अमित औटी, सचिन खोले, राजाभाऊ आरडे, व दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र शिंदे (वरीष्ठ विमा सल्लागार) उपस्थित होते. वृध्दाश्रमाचे संचालक भारतीय आयुर्विमा महामंडळ, राजगुरुनगर शाखेतील स्वेच्छा निवृत्त कर्मचारी दिलीप पटवर्धन यांनी सर्वांचे वृध्दाश्रमाला अचानक भेट दिल्या बद्दल स्वागत व आभार मानले.

Previous articleप्रवचनकार डॉ.रविंद्र भोळे यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य वैद्यकिय विभाग अध्यक्षपदी नियुक्ती
Next articleवेगरे च्या सरपंचपदी मिनाथ कानगुडे यांची बिनविरोध निवड