प्रवचनकार डॉ.रविंद्र भोळे यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य वैद्यकिय विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य ह्या अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील कार्यरत संस्थेच्या वैद्यकीय विभाग प्रमुख म्हणून अध्यक्षपदी उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार व प्रबोधनकार डॉ रवींद्र दिनकर भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष निलेश कोंडे देशमुख यांनी ही नियुक्ती केली. डॉ रवींद्र भोळे यांनी हवेली, पुरंदर, दौंड तालुका व पुणे जिल्ह्यात अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रवचनकार प्रबोधनकार म्हणून कार्य केले आहे तसेच व्यसनमुक्तीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी तसेच साधुसंतांनी विपुल लिखाण केले आहे परंतु अलीकडच्या तरुण पिढीला अध्यात्माची आवड नसल्यामुळे वाचन संस्कृती कमी होत आहे. परिणामी अध्यात्मातून संस्कार दिले जातात ते संस्कार मिळत नसल्यामुळे तरुण पिढी साधुसंतांच्या वांग्मय पासून व संतानी केलेल्या उपदेशा पासुन परावृत्त होतात. यासाठी अध्यात्मिक गोडी लागण्यासाठी समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे कार्य करीत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल अनेक ह भ प ,प्रवचन्कार,कीर्तन्कार तसेच वारकरी मित्र परिवार ह्यानी अभिनंदन केले.