खेड पोलीसांनी चोरट्यांची टोळी केली जेरबंद

राजगुरुनगर: खेड पोलिसांनी चोरी झालेल्या ४ लाख ५६ हजाराचा मुद्देमालासह ६ आरोपींना ८ तासात अटक केली आहे. रोटाव्हेटर चोरीमुळे आरोपींनी केलेली पहिली चोरी उघडकीस आली आहे.अशी माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी दिली.

या सविस्तर माहिती अशी कि.दि ८ नोंव्हेबर रोजी रात्रीच्या वेळी शिरोली (ता खेड ) येथील भानुदास बबन पवळे यांनी शेताच्या कडेला ठेवलेला ट्रॅक्टरचा रोटावेटर सहा जणांनी चोरून नेला होता. पवळे यांनी त्याच रात्री खेड पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. दरम्यान पोलिसांनी लागलीच घटनास्थळी गेले असता चोरिच्या घटनेपासुन रस्त्यावर एक संशयित टेम्पो व चालक पोलिसांना दिसुन आला पोलिसांनी टेम्पो ची पाहणी केली असता टेम्पोमध्ये रोटावेटर दिसून आला. पोलिसांनी संशयित चालकाची कसून चौकशी केली असता नाव पत्ता विचारला असता सोहेल उर्फ अमरअली मळी (वय २१ ). चक्रपाणी वसाहत भोसरी असे सांगितले. व टेम्पोत ठेवलेला रोटाव्हेटर शिरोली येथुन चोरी करून आणला असुन इतर साथीदार डोंगरात पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सोहेल मळी याला ताब्यात घेतले होते.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ थिटे सचिन जतकर ,शेखर भोईर, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, प्रविण गेंगजे यांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मदतीने धागेदोरे शोधत व पळून गेलेल्या आरोपींचे मोबाईल लोकेशन काढत ऋतिक उर्फ मसूऱ्या काशिनाथ मसुरे (वय १९ ) स्वप्निल चिमाजी तीरपाडे ( वय १९ ) अक्षय उर्फ बंटी रोहिदास वरे, (वय २१ सागर काळू बुरुड (वय २१ ), ऋतिक काशिनाथ सुरुकुले (वय १९ ) हे सर्व राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी यांना ८ तासात अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले. शिरोली येथे ६० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर चा रोटाव्हेटर चोरी केल्याचे आरोपींनी कबुल केले पोलिसांनी आरोपींची अजून कसून चौकशी केली असता गेल्या महिन्यात दि २९ / १० /, २०२० रोजी औदर (ता खेड ) येथे जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरचा जनरेटर किंमत १ लाख ९६ हजार रुपये याची चोरी करून देहूरोड येथे विकला असल्याचे आरोपींनी सांगितले. जनरेटर चोरी झाल्याची फिर्याद दिलीप दयाराम पवार रा. चासकमान ( ता. खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तात्काळ देहूरोड येथे जाऊन जनरेटर ताब्यात घेतला आहे. या घटनेत रोटाव्हेटर ,जनरेटर, एक टेम्पो असा ४ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Previous articleकुरकुंभ एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
Next articleशेवराई सेवाभावी संस्थाचे काम कौतुकास्पद -जिल्हा अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख